आमच्या मागण्या.

महाराष्ट्र गव्हर्मेंट पॉलिटेक्निक टीचर्स (गॅझेटेड वर्ग - १) वेलफेअर असोसिएशनच्या मागण्या.

  • पात्र अधिव्याख्यात्यांना वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी २००७ च्या बैठकीच्या निर्णयानुसार प्रदान करणे.
  • अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने जाहिर केल्याप्रमाणे सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी जशिच्या तशी ०१. ०१. २००६ पासुन करणे.
  • अधिव्याख्यात्यांना १३ वर्षांपासुन प्रलंबित असलेली पदोन्नती प्रदान करणे.
  • संघटनेस शासन मान्यता देणे.
  • संवर्ग विभाजनाचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करणे.
  • विभाग प्रमुख व प्राचार्य पदाच्या मुलाखतीसाठी असलेली वयाची जाचक अट शिथील करणे.
  • मंत्रालयातील तंत्रशिक्षण विभागातील सहसचिव हे पद पुन्हा निर्माण करणे.
  • शासकिय तंत्रनिकेतनातील अधिकार्‍यांच्या बदल्यासंबंधी शासन निर्णय काढताना संघटनेला विश्वासात घेणे.
  • कार्यरत अधिकार्‍यांची एकत्रित ज्येष्ठता सुची जाहिर करणे.
  • शासकिय तंत्रनिकेतनातील कुलमंत्री व उपकुलमंत्री ही पदे स्वतंत्ररित्या भरावी.