शनिवार, ३ जुलै, २०१०

औरंगाबाद बैठक.

सहाव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी उद्या औरंगाबाद येथे बैठक होत आहे. महाराष्ट्रातील बहुतेक शासकीय, अनुदानीत, खाजगी तंत्रनिकेतने तसेच अभियांत्रिकी महाविद्यालतील प्रमुख कार्यकर्ते, प्रतिनीधी या बैठकीला उपस्थीत रहाणार आहेत.
या बैठकीत सहावा वेतन आयोग लागू न करता शासना कडून होत असलेल्या विलंबामूळे पुढील पाऊल ठरवण्या बाबत चर्चा होणार असुन संचालक व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या सर्व कामांवर बहिष्कार टाकण्या बद्दल अंतिम निर्णय होणार आहे.
शासकीय कामांवर बहिष्कार टाकल्यास अभियांत्रिकी तसेच तंत्रनिकेतने यांच्या प्रवेश प्रक्रियेवर याचा परिणाम होणार असुन महाराष्ट्र गव्हर्मेंट पॉलिटेक्निक टीचर्स वेलफेअर असोसिएशनने तसा इशारा शासनास दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा