नमस्कार मित्रांनॊ,
या ब्लॉगवर मी सर्व तंत्रनिकेतन शिक्षकांचे स्वागत करतो.
महाराष्ट्र गव्हर्मेंट पॉलिटेक्निक टीचर्स (गॅझेटेड वर्ग -१ ) वेलफेअर असोसिएशन आपल्या प्रलंबित मागण्यांची पुर्तता न झाल्याने येत्या तीन एप्रिल पासुन आंदोलन करित आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानेही पाठिंबा दिला असुन. या सोबतच महाराष्ट्र राज्यातील अशासकिय अनुदानित तंत्रनिकेतनातील शिक्षकांनीही सक्रिय पाठिंबा दिला आहे.
या आंदोलनाचा भाग म्हणून येत्या ३ एप्रिल २०१० पासुन सर्व शिक्षक काळ्या फिती लावून काम करतील.
दिनांक ६ एप्रिल २०१० पासुन म. रा. तं. शि. मंडळाच्या व तंत्रशिक्षण संचालनालयाच्या सर्व प्रकारच्या कामांवर बहिश्कार टाकतील. तसेच स्वायत्त संस्थेतील परिक्षांच्या कामावर देखिल बहिष्कार टाकतील.
यानंतर घडणार्या सर्व घटना या ब्लॉगवर कळविल्या जातील. कृपया रोज येथे भेट देवून आपली माहिती अद्ययावत ठेवावी ही विनंती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा